महिला सक्षमीकरण काळाची गरज

HomeNewsनागपुर डिवीजन

महिला सक्षमीकरण काळाची गरज

गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे; चुनाळा जि.प. शाळेत महिला दिन साजरा
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा (मराठी) चुनाळा येथे (दि. ११) रोज बुधवारला जागतिक महिला दिन निमित्य कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राजुरा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती मंगलाताई तोडे यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलींनी, महिलांनी केवळ कुटुंबापुरते मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात समोर येणे गरजेचे आहे. महिला शिकल्यामुळे कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो. यासाठी महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले, सोबतच आई वडीलांनी मुलांच्या पोषणाविषयी जागरुक असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष रेखा तुराणकर होत्या प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे, प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख नारायण तेलकापल्लीवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय चोथले, ग्राम पंचायत सदस्या संतोषी निमकर, वंदना पिदुरकर, मुख्याध्यापिका अनिता डंबारे, अंगणवाडी सेविका ललिता अंड्रस्कर, सुवर्णा वडस्कर उपस्थित होत्या. यावेळी कतृत्वान माता म्हणून शारदा गोगुलवार यांची मुलगी गरीब परीस्थितीतून शिक्षण घेऊन सनदी लेखापाल झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच मुलींच्या संरक्षणारीता कराटे सादरीकरण करुन मुलींना स्वतःचे संरक्षण स्वतः करण्याचे सांगितले. महिलांकरीता काही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता डंबारे यांनी केले तर संचालन कु. रिया रामेश्वर कार्लेकर आभार कु. समीक्षा गजानन कष्टी यांनी केले.

फोटो : महिला दिनानिमित्य उपस्थित गटशिक्षणाधिकारी मंगला तोडे व इतर मान्यवर

COMMENTS

You cannot copy content of this page