जागतिक महिला दिनानिमित्त साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा यांचा अनोखा उपक्रम.

HomeNewsनागपुर डिवीजन

जागतिक महिला दिनानिमित्त साळवे स्वस्त औषधी सेवा राजुरा यांचा अनोखा उपक्रम.

– क्षयरोग रुग्णांना केल्या पोषण किटचे वितरण.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा ९ मार्च
            क्षयरोग एक संसर्गजन्य आजाराबरोबर एक सामाजिक समस्या आहे. क्षयरोग भारतातील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य आव्हाना पैकी एक असून दरवर्षी २६ लाख नवीन क्षय रुग्ण निर्माण होऊन त्यापैकी ४.४ लाख रुग्ण दगावतात. शासन स्तरावर रुग्णालाऔषधोपचार मोफत मिळतो. तसेच एक हजार रुपये दर महा मिळतात परंतु यांना सकस आहार पोषण युक्त मिळावा यासाठी शासनाने आवाहन केले सामाजिक संस्था, सामाजिक कार्याची आवड असणारे व्यक्ती यांनी मदत करावी व टीबी रुग्ण यांना पोषण आहार किट द्यावी त्यांना प्रतिसाद देत साळवे स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स संचालक माधुरी साळवे यांच्या कडून दोन टीबी रुग्ण यांना पोषण कीट व प्रमोद लहुजी साळवे यांचे कडून दोन पोषण किट तसेच वाढदिवसानिमित्य हर्ष बजरंग जेणेकर राजुरा यांचे कडून सुद्धा दोन पोषण किट असे एकूण सहा किट जिवती तालुक्यातील टीबी रुग्णांसाठी पोषण आहार किट सचिन शरद बरडे सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर जिवती यांच्या माध्यमातून टीबी रुग्णांपर्यंत पोहचवण्यात आले. पोषण आहार किट देऊन सहकार्यासाठी  डॉ. टेंभे तालुका आरोग्य अधिकारी जिवती यांनी साळवे व जेणेकर परिवाराचे आभार मानले.

COMMENTS

You cannot copy content of this page