अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा जिल्ह्या कार्यकारणी गठीत

HomeNewsनागपुर डिवीजन

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडारा जिल्ह्या कार्यकारणी गठीत

भंडारा जिल्हाध्यक्षपदी मदन बांडेबुचे यांची नियुक्ती
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हास्तरीय सभा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांचे अध्यक्षतेखाली तर महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे , पूर्व विदर्भ प्रमुख सुनील आंडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सर्व संमतीने नवीन जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली त्यामध्ये जिल्हा संघटक म्हणून डी जी रंगारी, जिल्हाध्यक्ष म्हणून मदन बांडेबूचे, जिल्हा सचिव मूलचंद कुकडे, कार्याध्यक्ष प्रा अशोक गायधने, जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद जांभुळकर, रामभाऊ येवले, कोषाध्यक्ष ए बी भोयर, युवा संपर्कप्रमुख पियुष ठवरे, महिला संपर्कप्रमुख प्रियाताई शहारे, मीडिया प्रमुख विपीन पंचभाई तर कार्यकारणी सदस्य म्हणून रत्नाकर तिडके, गोपाल शेलोकर, रमेश गोटेफोडे, कीर्ती गणवीर, हेमा गजभिये त्याचप्रमाणे जिल्ह्यातील तालुका संघटक म्हणून भंडारा प्रेमलाल लांजेवार, तुमसर राहुल डोंगरे ,लाखनी अशोक वैद्य, लाखांदूर सुनील बारसागडे, पवनी प्रकाश पचारे अशा पद्धतीने कार्यकारणी नवीन तयार करण्यात आली असून या कार्यकर्त्यांनी आपापले पदभार स्वीकारून चांगल्या पद्धतीचे काम करावे असे मत राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे व महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पातोडे यांनी मत व्यक्त केले उपस्थित होते
नवीन भंडारा जिल्हा कार्यकारणी ते पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे

COMMENTS

You cannot copy content of this page