शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमात माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आकाश कारेमोरे यांचे भुमी अभिलेख कार्यालय देवरी येथे सिलेक्शन झाल्याबद्दल सत्कार

HomeNewsनागपुर डिवीजन

शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमात माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आकाश कारेमोरे यांचे भुमी अभिलेख कार्यालय देवरी येथे सिलेक्शन झाल्याबद्दल सत्कार

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – तालुक्यातील शहापूर येथीलनानाजी जोशी विद्यालय शहापूर येथे ‌दिनांक 13/2/2026 रोजी इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने ‌दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‌निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ‌‌अध्यक्षस्थानी ग्रामविकास समिती शहापूर चे अध्यक्ष मुकुंदराव फेंडारकर, ‌ विशेष अतिथी व ‌सत्कारमूर्ती म्हणून भंडारा पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे तसेच भूमी अभिलेख ‌कार्यालय देवरी येथील ‌सर्व्हेअर ‌आकाश कारेमोरे यांच्यासह ‌प्रमुख अतिथी म्हणून ‌ग्रामविकास समिती शहापूरचे उपकार्यवाह राजेश खोब्रागडे, ‌ मुख्याध्यापक सुरेश चांदेवार, ‌विज्ञान विभाग प्रमुख दिलीप सुहाम, पर्यवेक्षक विवेकानंद हटवार आणि वंदना धकाते हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शिक्षक लोकेश सार्वे यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‌शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या ‌ दोन्ही सत्कारमूर्तीं यांचा परिचय करून दिला ‌तसेच मान्यवरांच्या हस्ते ‌सत्कारमूर्ती ‌ भंडारा पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे आणि ‌सर्व्हेअर आकाश कारेमोरे ‌यांचा ‌ ‌ शाळेच्या वतीने स्मृतीचिन्ह, ‌शाल श्रीफळ व बुके देऊन ‌विशेष ‌‌स्वागत व सत्कार करण्यात आला. वर्ग दहावीच्या ‌उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक सुरेश चांदेवार ‌त्याचप्रमाणे पर्यवेक्षक विवेकानंद हटवार यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना ‌आगामी एसएससी ‌परीक्षा विषयी ‌मोलाचे मार्गदर्शन केले. ‌

पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे ‌यांनी विद्यार्थ्यांना ‌ नियमित अभ्यासाचे महत्त्व ‌ व वेळेचे व्यवस्थापन ‌या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व ‌विद्यार्थी ‌जीवनातील शाळेतील आठवणींना उजाळा दिला. विशेष अतिथी ‌सर्व्हेअर आकाश कारेमोरे ‌ यांनीदेखील परीक्षेमध्ये यश प्राप्तीसाठी ‌निरंतर सराव आत्मविश्वास ‌आवश्यक असतो ‌ असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुकुंदराव फेंडारकर ‌यांनी विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड परीक्षेचे जीवनातील ‌अनन्य साधारण महत्व ‌याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कोमल वैद्य आणि ‌ख्रिष्टी सार्वे ‌यांनी तर आभारप्रदर्शन ‌ समीक्षा गायधनी ‌या विद्यार्थिनींनी केले. पाणवलेल्या डोळ्यांनी ‌ सर्वांनी शाळेला भावनिक निरोप दिला.

COMMENTS

You cannot copy content of this page