गौतम नगरी चौफेर (गौतम धोटे) – मृत्यू अटळ, शरीर नाशवंत असला तरी त्यांचे कर्म मात्र अमर राहणार ” म्हणजे मरण आले तरी आपली कीर्ती, नाव, लोकांच्या मनात कायम राहावी यासाठी व्यक्तीने असे उत्तम कर्म करावे की — माणूस शरीराने जरी नसला तरी त्याच्या चांगल्या कर्मांमुळे त्याची कीर्ती चिरंजीव राहील.
मृत्यूनंतरही लोक त्यांची आठवण ठेवतील. त्यांच्या कार्याचा गौरव करतीलच. असे मत आवाळपूर येथील डॉ रामपाल महाराज धारकर यांनी व्यक्त केले.आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा, श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ आवळपूर, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खंजिरी भजन स्पर्धा व समाज प्रबोधनपर किर्तनाचा कार्यक्रमा आयोजित आवाळपूरात करण्यात आला होता, त्या दरम्यान पार पडला. त्याप्रसंगी डॉ रामपाल धारकर प्रबोधनात ते बोलत होते.

यावेळी अध्यक्षस्थानी आवाळपूर गावचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे होते. तर उद् घाटक माजी आमदार अॅड संजयभाऊ धोटे यांनी केले, राष्ट्रसंतांनी समाज घडविताना हजारो नागरिकांच्या मनात सृजनात्मक विचार पेरले. मानवतावादी दृष्टीकोन बाळगला. राष्ट्र प्रेमाची भावना निर्माण केली. स्वच्छतेच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा धडा दिला. परिवर्तनशील समाज घडवण्यासाठी हजारो हातांना एकत्र येऊन काम करावे लागते. यासाठी समाजातील वाईट गोष्टींना नष्ट करायचे असेल तर राष्ट्रसंतांच्या विचारांचे बीज नागरिक व युवकांमध्ये पेरावे लागेल. या कार्यासाठी हजारो हात एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अॅड. संजय धोटे यांनी उद्घाटक वेळी केले, यावेळी आवाळपूरच्या सरपंच प्रियंका दिवे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, साजिद बियाबानी, माजी जि,प,सदस्य शिवचंद्र काळे, सेवानिवृत्त
प्राचार्य जनार्धनजी डाहुले, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य राजेश खेरानी, कल्पतरू कन्नाके, मनीषा कोट्टे, शारदा मोहुले, माज उपसरपंच सुरेश टेकाम,अध्यक्ष त,मु,समितीचे सुरेश धोटे, प्राचार्य झुरळे आणी राहुल बोढे यांची उपस्थित होती.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. स्वर्गीय मामुलकर याने तळागाळातील समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून विकासाचे दालन खुले केले. त्यामुळे हजारो विद्यार्थी आज स्वाभिमानाने जगत आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श पुढे नेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आहे असे ते म्हणाले. संचालन काकडे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य वारकड यांनी केल यावेळी सांगोडा, अंतरगाव,गाडेगाव,कढोली, हिरापूर,नांदा, बिबी सह आदी गावातून नागरीक या लोकप्रिय–
लोकनेते स्व. प्रभाकरराव मामुलकर साहेब यांच्या जयंतीप्रित्यर्थ बंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण निमित्याने
राज्यस्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा दि. १७, १८ व
१९ घेण्यात आली होती🙏
💙आवाळपूरात💙
💚गौतम नगरी चौफेर💚



COMMENTS