भाऊच्या दहीहंडीची राजुरात धूम ; रजनी पाल च्या उपस्थितीत दहीहंडीचा थरार.

HomeNewsनागपुर डिवीजन

भाऊच्या दहीहंडीची राजुरात धूम ; रजनी पाल च्या उपस्थितीत दहीहंडीचा थरार.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीच्या उत्साहाने राजुरा शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले असतानाच ‘भाऊच्या दहीहंडी’ने शहरात उत्साहाला अक्षरशः उधाण आले. अरुणभाऊ धोटे मित्रमंडळ, शिवाज्ञा वाद्यपथक व शिवाज्ञा गोशाला आणि शिवमंदिर, सोनिया नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषद राजुरा परिसरातील मुख्य चौकात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. बेस्ट अँकर रजनी पाल यांच्या विशेष उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. दहीहंडी सोहळ्यासाठी शहरातील नगर परिषद तलाव जवळील मुख्य चौक आकर्षक विद्युत रोषणाई, मनमोहक सजावट, डिजेची सुबक व्यवस्था करण्यात आली होती. डिजेच्या दणदणाटात आणि ‘गोविंदा आला रे!’च्या जयघोषात गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर रचत केलेल्या चित्तथरारक कसरतींनी हजारो उपस्थितांची मने जिंकली. हंडी फोडण्याच्या प्रत्येक प्रयत्नावेळी नागरिकांकडून टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष करण्यात येत होता.

यावेळी सर्वाधिक उंच मनोरे रचनारे गोविंदा पथक जय जगन्नाथ बाबा, चिंतलधाबा प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये तर श्रीराम बालक आखाडा, बल्लारपूर द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह देऊन नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट कन्हैया स्पर्धेत धृण धानोरकर प्रथम पारितोषिक २१०० रुपये , त्रिशा द्वितीय पारितोषिक १५०० रुपये आणि शिवांश कुणाल मोकळे तृतीय पारितोषिक ११०० रुपये व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सत्कारमूर्ती म्हणून क्रीडा क्षेत्र- पाशा शेख, शिक्षण व पर्यावरण – बादल बेले, सामाजिक – संगीता संतोष मामीडवार, एमपीएससी द्वारा राज्य कर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल संतोष निरांजने, IPS कूमार सुशांत, नायब तहसीलदार तेलंग, नंदिनी मडावी आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, उपनगराध्यक्ष दिलीप डेरकर, परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशांत कूमार, नायब तहसीलदार तेलंग, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रमेश नळे, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, कृ. उ. बा. स. सभापती संतोष इंदूरवार, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप जैन, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, न प सभापती अनंतकुमार ताजने, पूनम गिरसावळे, अन्नुताई संधु, गीताताई पथाडे, नगरसेवक एजाज अहमद, संध्याताई चांदेकर, निता बानकर, इंदूबाई निकोडे, वज्रमाला बतकमवार, फरीना सय्यद, पोर्णिमा सोयाम, मंगला मोकडे, कार्यक्रमाचे आयोजक अरुणभाऊ धोटे मित्रमंडळ चे अध्यक्ष तथा यु. काँ. उपाध्यक्ष निरंजन मंडल, शिवाज्ञा वाद्यपथक व शिवाज्ञा गोशाला चे अध्यक्ष संतोष मामीडवार, शिवमंदिर, सोनीया नगर चे अध्यक्ष अश्विन बावनकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष उमेश गोणेलवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय लांडे, यु. काँ. शहराध्यक्ष रोशन लांडे, एनएसयूआय तालुकाध्यक्ष सुजल वाढई, अल्पसंख्यांक काँग्रेस तालुकाध्यक्ष अस्लम चाऊस, संघपाल देठे, आकाश मावलीकर, मधुकर झाडे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळाचे सदस्य आकाश यादव, अरविंद वाघाडे, यश गौरकर, अभी जगत, अमोल बावनकर, आकाश झाडे, गणेश चौधरी, भुषण देशमुख, अमोल ढोले, रोशन दिघे, प्रेम चंदनखेडे, नंदीनी मडावी, प्रीया मामीडवार, मयुर देशमुख, दिनेश खोडमवार, शुभम आत्राम यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page