पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा ; अँड. अभिजित वंजारी यांच्या प्रचाराला गती!

HomeNewsनागपुर डिवीजन

पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा ; अँड. अभिजित वंजारी यांच्या प्रचाराला गती!

राजुरा विधानसभा काँग्रेस आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने सहविचार सभा उत्साहात ; पदवीधर मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता. प्र.) :–
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प. ), शिवसेना (उबाठा), रिपाई (गवई गट), विमाशि व इतर शिक्षक व कर्मचारी संघटना व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अँड. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजुरा येथे आयोजित सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. राजुरा विधानसभा काँग्रेस आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज संकुलातील (सुपर मार्केट हॉल) येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पदवीधर मतदारांशी संवाद साधत निवडणूक प्रचाराला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सभेला पदवीधर मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, पदवीधर आमदार अँड. अभिजितदादा वंजारी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, राजुरा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड. सदानंद लांडे, अँड. सत्यपाल कातकर, महिला जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर, नामदेव ढेंगणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, रंजन लांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष आशिफ सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक सिनेट सदस्य दीपक धोपटे यांनी केले. आनंद चलाख यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रशांत धाबेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि राजुरा विधानसभा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. पदवीधर मतदारांच्या मोठ्या उपस्थितीमुळे सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

You cannot copy content of this page