कवी/गायक/प्रबोधनकार तथा पत्रकार उमेश बोरकर यांना “राज्यस्तरीय प्रबोधनकार कला पुरस्कार 2026 सन्मानित”

HomeNewsनागपुर डिवीजन

कवी/गायक/प्रबोधनकार तथा पत्रकार उमेश बोरकर यांना “राज्यस्तरीय प्रबोधनकार कला पुरस्कार 2026 सन्मानित”

गौतम नगरी चौफेर (भंडारा) – तालुक्यातील पहेला या ठिकाणी दिनांक ०९/ जुन २०२६ ला सन्मान द्या व सन्मान घ्या या पत्रकार संजीव भांबोरे यांच्या सामाजिक उपक्रमा अंतर्गत विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक: दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार खुशाल बोपचे उपस्थित होते. विशेष आकर्षण म्हणून चैताली भस्मे, अभिनेता अश्विन कुमार वघाले, उपस्थित होते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ फुले ,शाहू, आंबेडकरी नेते अशोक सोनवणे छत्रपती संभाजीनगर,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, अखिल भारतीय बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पारधी, प्रबोधनकार विनोद बन्सोड वडद/ पुनर्वसन, शाहीर गणेश मेश्राम तुमसर, सुप्रसिद्ध गायिका ताराबाई किन्हेकर नागपूर, गायिका शितल नागदिवे साकोली, भिम शाहीर प्रदीप कडबे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमात साकोली तालुक्यातील सातलवाडा येथील कवी/ आर्केस्ट्रा गायक/ प्रबोधनकार तथा पत्रकार महाराष्ट्र न्यूज 24 मराठी वर्तमान पत्राचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी उमेश बोरकर यांच्या सामाजिक तथा कलाक्षेत्रातील तसेच पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यांना “राज्यस्तरीय प्रबोधनकार कला” पुरस्कार 2026 सन्मानित करून प्रशस्तीपत्र, शाल, पुष्पगुच्छ, मानाचा फेटा तथा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी न्यूज प्रभात चैनल चे पत्रकार पंकज रहांगडाले, शाहीर श्रीकांत नागदेवे, सदानंद मोरे, गायिका नीलकमल गोंडाने, पत्रकार डीजे रंगारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजना भांबोरे यांनी केले. यावेळी गायक गायिका प्रबोधनकार पत्रकार समाजबांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page