गॅस पेट्रोल दे ना सके जो ,वो सरकार निकम्मी है,जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, या नाऱ्यानी दुमदुमला परिसर

HomeNewsनागपुर डिवीजन

गॅस पेट्रोल दे ना सके जो ,वो सरकार निकम्मी है,जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, या नाऱ्यानी दुमदुमला परिसर

• 36 राज्यातील 650 जिल्ह्यात उमटले पडसाद
गौतम नागरी चौफेर – श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर” भंडारा :- जनतेची जनतेद्वारा जनतेसाठी निर्मित ,स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा घोषित करणारी बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने देशहितासाठी व जनसामान्यांच्या दुःख व असहनिय पीडा लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या जनता विरोधी नीती विरोधात चरणबद्ध जनआंदोलन करण्यात आले, सरकार च्या महागाई, बेरोजगारी, व संविधान विरोधात असणाऱ्या स्मार्ट मीटर व अवाढव्य वाढीव वीज बिला विरोधात, गॅस, पेट्रोल, डिझेल ,च्या तुटवड्या विरोधात, नीट, टीईटी परीक्षा च्या गोंधळाविरोधात  बहुजन मुक्ती पार्टी ने आंदोलन केले, त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून जाहीर निषेध करण्यात आला, तसेच नारेबाजी ने परिसरातील सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते, जनहितार्थ मागण्या चे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले, यावेळी जिल्हा अध्यक्ष सुभाष भिवगडे, रविदास लोखंडे, कपिल रंगारी, शरयू डहाट, मोहित वैद्य, बामणेसर ,संजय भोले ,मुकुल सूर्यवंशी, इलेक्ट्रिक मॅन अभय डी रंगारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मागणी पूर्ण न झाल्यास 31 मे ला संपूर्ण देशभर राष्ट्रव्यापी  दे धक्का जनआंदोलन केले जाईल असा गंभिर इशारा देण्यात आला
(👉केंद्र सरकारच्या जनता विरोधी नीती विरोधात बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रव्यापी चूल पेटवा  आंदोलनाला जनतेचा उस्फुर्त आक्रमक प्रतिसाद.

गॅस पेट्रोल दे ना सके जो, वो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, या नाऱ्यानी दुमदुमला परिसर

COMMENTS

You cannot copy content of this page