“संजीव भांबोरे गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर ) दि :9 जून 2026 रोजी होत असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे केले आयोजन भंडारा जिल्ह्यातील पहेला या गावी सम्यक बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये होणार हा आगळावेगळा अभिष्टचिंतन सोहळा साजरा छत्तीसगड राज्यातील बालाघाट लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार बोधसिंग भगत, ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे, दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक तथा फुले शाहू आंबेडकर चळवळीचे अभ्यासक दशरथ सुरडकर, चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध सिने अभिनेते अश्विन कुमार बघाले, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री चैताली भस्मे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून यांच्या हस्ते या सोहळ्यामध्ये विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यामध्ये डॉक्टर, वकील ,पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते कलाकार, कवी , प्रबोधनकार, अभिनय कला,उत्कृष्ट कर्मचारी/अधिकारी/ आदींना सन्मानित करण्यात येणार आहे. संजीव भांबोरे हे विदर्भातील एक पत्रकारिता क्षेत्रातीलच नव्हे परंतु सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग भरारी घेणार कुशल सर्वगुणसंपन्न नेतृत्व असून ते अनेक कला गुणांनी व पत्रकारितेच्या त्यांच्या निर्भीड लेखणीने प्रसिद्ध असून त्यांनी वाचकांच्या व सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे एक प्रखर व निर्भीड वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा वाढदिवस असो किंवा सामाजिक कार्यक्रम असो त्यामध्ये ते पूर्णपणे झोकून देतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी विदर्भात मोठ मोठे सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते त्यांनी सामाजिक केलेल्या कामामधून उपेक्षित घटकांना सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विचारपीठ नवजीवनाचा नवा मार्ग निर्माण करून दिलेला आहे अशा या सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व बाबत लिहावं तेवढं कमी आहे.
मागील वर्षी सुध्दा त्यांनी चिचाळ येथे शांतीवन बुद्ध विहारात त्यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला होता या सोहळ्याला सुद्धा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिनांक:09 जून 2026 रोजी भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या स्वतःच्या गावी म्हणजेच पहेला येथे होत असलेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या ध्येयवेढ्या व सामाजिक जाणीव असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व जेष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रभरातून त्या प्रमाणात शुभेच्छाचा वर्षाव होणार आहे.
या सोहळ्याला जास्तीत जास्त महाराष्ट्रातून नवे विदर्भातून त्यांच्या चाहत्यांनी पत्रकारांनी उपस्थित रहावे अशी आवाहन आयोजकांनी केले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हे दोन शब्द हे समर्पित करीत आहे.
*दशरथ एन सुरडकर*
(मुख्य संपादक )*
*दैनिक माझा मराठवाडा*
छत्रपती संभाजी नगर


COMMENTS