अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना च्या वतीने सहाय्यक आयुक्त भंडारा यांना ईमेलद्वारे  निवेदन

HomeNewsनागपुर डिवीजन

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटना च्या वतीने सहाय्यक आयुक्त भंडारा यांना ईमेलद्वारे  निवेदन

• डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार,अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याची संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेश्राम यांनी केली मागणी.
  • प्रस्तावित.अर्जाची अंतिम मुदत 15 मार्च 2026 रविवार असल्यामुळे अर्जदारास संभ्रम.
गौतम नगरी चौफेर श्रीकृष्ण देशभ्रतार
भंडारा/तुमसर :- महाराष्ट्र शासनाच्या ‘सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा’ अंतर्गत आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, तसेच अपंग, गोरगरीब, गरजू व दीनदुबळ्यांना मदत करणाऱ्या समाजसेवकांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारा’ची घोषणा करून विविध वृत्तपत्रांमध्ये त्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शासनाचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.

सदर पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ (रविवार) निश्चित करण्यात आली होती. मात्र, अंतिम मुदतीचा दिवस हा सार्वजनिक सुट्टीचा (रविवार) असल्याने, ‘कार्यालय बंद असेल व अर्ज सोमवारी स्वीकारले जातील’ या समजुतीने अनेक इच्छुक आणि पात्र समाजसेवकांना वेळेवर आपले अर्ज प्रत्यक्ष कार्यालयात जमा करता आले नाहीत.

तरी आपणास नम्र विनंती आहे की, अनेक पात्र सामाजिक कार्यकर्त्यांची संधी हुकू नये याकरिता, अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करून ती मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाढवण्यात यावी, जेणेकरून जास्तीत जास्त पात्र समाजसेवकांना या सन्मानासाठी अर्ज करण्याची योग्य संधी मिळेल.
असे नमूद केलेल्या ईमेल द्वारे विनंती पत्रकात अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र मेश्राम व संघटनेचे संस्थापक समाजसेवक श्रीकृष्ण देश भ्रतार यांनी अंतिम मुद्दत वाढ विनंती पत्राद्वारे केली आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page