साकोली तालुक्यातील आलेबेदर येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद

HomeNewsनागपुर डिवीजन

साकोली तालुक्यातील आलेबेदर येथे दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद

– 150 च्या वर बौद्धभिक्खू यांची उपस्थिती
गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे भंडारा – भदंत प्रज्ञाज्योती बहुउद्देशीय संस्था आलेबेदर तुडमापुरी वतीने त्रिरत्न बौद्ध विहार नागजीरा  रोड साकोली येथे दोन दिवशीय फाग पौर्णिमेनिमित्त बौद्धधम्म परिषद आयोजित करण्यात आली होती सर्वप्रथम सकाळी 9 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व व त्यानंतर बौद्धविहार ते चैत्यापर्यंत रॅली काढण्यात आले दुपारी 2 वाजेनंतर धम्मदेशना घेण्यात आली त्यामध्ये पूज्य भिक्खू महापंत दत्तवाडी नागपूर, भिक्खू सुगत, पूज्य भिकखू नागदीपकर, सुगतानंद कीर्ती, भिक्खू दर्शनदीप पंजाब, भिक्खू चेती  संग्रामगिरी भिक्खू नागसेन, भिक्खू आनंद, भंते रूपानंद, पूज्य धम्मदिना, व इतर मोठ्या संख्येने 150, वर भंते या प्रसंगी उपस्थित होते दिनांक 2 तारखेलाभिक्खू संघातर्फे धम्मदेशना करण्यात आली धम्मदेशनाच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कसं होईल या दृष्टिकोनातून भिक्खू संघातर्फे मार्गदर्शन करण्यात आले
दिनांक 3 सकाळी समता सैनिक दल साकरा यांच्याकडून भिकू संघाला अल्पोपहार देण्यात आला तारखेला भिक्खू संघ व समता सैनिक दल यांच्यामार्फत डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोली येथून त्रिरत्न बुद्धविहार आलेबेदर येथे रॅली काढण्यात आली लिंबूनि चौक जमानापूर आंबेडकर राईट ॲक्टिव्ह सोशल वर्कर फोरम यांच्यातर्फे भंतेजींच पाय धुऊन स्वागत करण्यात आले व पाण्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर दुपारी 11 वाजता आंबेडकर राईट ऍक्टिव्ह सोशल वर्कर फोरम जमनापूर कॉलनी कडून भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आली पुन्हा त्या दिवशी दुपारी 2 वाजता धम्मदेशना देण्यात आली. त्यानंतर रात्री 8 वाजता प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम घेण्यात आल्या जवळपास 15 प्रबोधनकार कव्वाल आपले प्रबोधन गीताच्या माध्यमातून प्रबोधन केले त्यानंतर समता सैनिक दल तर्फे 8 लोकांचा सत्कार करण्यात आला रात्री आठ वाजता बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांचे प्रबोधनात्मक भाषण झाले धम्म कुठे आलेबेदर येथे रात्रभर नालंद बौद्ध विहार बांपेवाडा यांच्याकडून मोफत दोन दिवस रात्रभर चहाचे वाटप  सकाळी नाश्ता देण्यात आले त्याचप्रमाणे खांबा जांभळी पी एस सी तर्फे रुग्णांना औषधोपचार व वधू वर परिचय मेळावा मोफत नोंदणी घेण्यात आली या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भदंत प्रज्ञा ज्योती भिकू बहुउद्देशीय संस्था आलेबेदर ते प्रमुख भिकू नागसेन यांच्या नेतृत्वात भिकू आनंद , श्रमनेर नागरत्न यांनी धुरा सांभाळली या सर्व कार्यक्रमाचे सेवा सुरक्षा समता सैनिक दल भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली याची सैनिकांनी पार पाडले खूप मोठ्या जवळपास 50 हजार वर बौद्ध उपासक उपासिका या प्रसंगी उपस्थित होते हे विशेष
आंबेडकरराईट ऍक्टिव्ह सोशल फोरम तर्फे दोन दिवस बौद्ध उपासकांना नागझिरा चौक ते धम्मकुटी आलेबेदर येथे मोफत प्रवास देण्यात आला

COMMENTS

You cannot copy content of this page