गौतम नगरी चौफेर हर्षवर्धन देशभ्रतार भंडारा :- दसबल पहाडी भिक्खू संघ, सीतेपार, हत्तीडोई भंडारा द्वारा निःस्वार्थपणे सप्तआचरणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत असून,दिव्यांग संघटन. द्वारे बेबस लाचार दिव्यांग निराश्रित लोकांची सेवा करत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार यांना 32 व्या बौद्ध संमेलनात राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांमध्ये बौद्ध भिक्खु कुसल मुनी, भिक्खुनी संघप्रिया महाथेरी, भिक्खुनी धम्मज्योती, भदंत सुगता बोधी, महाथेरो, भिक्खू भिक्खुनीस, व्ही.एस. चुरे साहेब, अमृत बनसोड, प्रा.प्रियदर्शन सोनटक्के,सुर्यभान हुमने,दिनेश वासनीक, प्रा.डॉ.शीलवंतकुमार मडामे, डॉ.प्रा.देवानंद नंदागवळी यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. बुद्ध भीम गीतावर मुलांचे सजीव सादरीकरण आणि शिवदासजी वहाणे यांच्या सुरेल गायनाने वातावरणात उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाचे संचालन दिनेश कांबळे यांनी केले, तर आभार मदनपाल गोस्वामी यांनी मानले.


COMMENTS