शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार : आ. सुधीर मुनगंटीवार

HomeNewsनागपुर डिवीजन

शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार : आ. सुधीर मुनगंटीवार

गौतम नगरी चौफेर (चंद्रपूर) – चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या संगीता खांडेकर यांची निवड झाल्यानंतर भाजपाचे नेते माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत या निवडीमुळे चंद्रपूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम होईल आणि महापालिकेच्या माध्यमातून लोककल्याणकारी निर्णय अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महापौरपदाच्या या निवडीसाठी भारतीय जनता पक्षाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्व घटक पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धारही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

COMMENTS

You cannot copy content of this page